निलंगा: जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत निलंगा, देवणी व शिरूर अनंतपाळ तालुक्यांमधील ५ तीर्थस्थळांना 'क' वर्ग दर्जा
Nilanga, Latur | Sep 18, 2025 जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत निलंगा मतदारसंघातील निलंगा, देवणी व शिरूर अनंतपाळ तालुक्यांमधील ५ तीर्थस्थळांना 'क' वर्ग तीर्थक्षेत्र दर्जा दिल्याबद्दल जिल्ह्याचे पालकमंत्री मा.ना.श्री. शिवेंद्रराजे भोसले साहेब यांचे सर्व नागरिकांच्या वतीने मन:पूर्वक आभार! या निर्णयामुळे या मंदिरांच्या विकासाला अधिक चालना मिळेल. तसेच येणाऱ्या भाविकांच्या सुख-सुविधांसाठी पायाभूत सुविधांची उभारणी केली जाईल. ज्यामुळे येथील तीर्थक्षेत्राला चालना मिळून भागाचा विकास अत्यंत वेगाने होईल.