महाड: महाड नगरपरिषद निवडणुकीत प्रभाग क्रमांक 2 मधील मतदान केंद्र क्रमांक 3 वर मोठा गोंधळ, दोन्ही समर्थकांमध्ये हाणामारी
Mahad, Raigad | Dec 2, 2025 रायगडच्या महाड नगरपरिषद निवडणुकीत प्रभाग क्रमांक 2 मधील मतदान केंद्र क्रमांक 3 वर मोठा गोंधळ झाला. जवळपास दोन ते अडीच तास EVM मशीन बंद पडल्याने मतदान प्रक्रिया ठप्प झाली आणि मतदारांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. परिस्थिती तपासण्यासाठी शिवसेनेचे विकास गोगावले आणि राष्ट्रवादीच्या नेत्या, माजी नगराध्यक्ष स्नेहल जगताप यांनी केंद्रावर भेट दिली. याचदरम्यान मतदार पुराव्याबाबत हरकतीमुळे दोन्ही गटांमध्ये शाब्दिक वाद वाढत मारहाणीपर्यंत पोहोचला. राष्ट्रवादीचे नेते सुशांत जाबरे यांच्यावर हल्ला झाल्याने तणाव आणखी चिघळला. दोन गटांमधील मारहाणीमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. रायगड जिल्ह्यातील राजकारणात सुनील तटकरे आणि भरत गोगावले यांचा संघर्ष नगरपरिषद निवडणुकीमुळे शिगेला पोहचला आहे.