अंबाजोगाई शहरातून रवि रोकडे यांची टाटा सुमो गाडी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. ही संपूर्ण चोरीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून, सध्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार ,रवि रोकडे यांनी नेहमीप्रमाणे आपली टाटा सुमो गाडी घराबाहेर उभी केली होती. मात्र मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी गाडी पळवली. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.