जालना: लालबाग परिसरातील नागरिकांकडून राकेश किशोर यांचा निषेध; सरन्यायाधीश बी. आर. गवई यांच्यावरील हल्ला म्हणजे लोकशाहीवरच हल्ला
Jalna, Jalna | Oct 15, 2025 देशाच्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश बी. आर. गवई यांच्यावर वकील राकेश किशोर यांनी केलेल्या हल्ल्याच्या प्रयत्नाच्या घटनेचा तीव्र निषेध जालना शहरातील लालबाग व परिसरातील नागरिकांनी केला आहे. या घटनेमुळे दलित समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या असून संविधानाचा अपमान झाल्याची भावना व्यक्त करण्यात आली. त्यामुळे बुधवार दि. 15 ऑक्टोबर 2025 रोजी सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास निषेध मोर्चा आयोजित केला होता. या पार्श्वभूमीवर कन्हैय्यानगर, लालबाग, हनुमान घाट, खांडसरी परिसरातील लोक उपस्थित होते.