आंबेगाव: मंचर-शिरूर रस्त्यावर कॅनॉलच्या मोरीजवळ झालेल्या एका भीषण अपघातात अवसरी बुद्रुक येथील दोन भावांचा मृत्यू
Ambegaon, Pune | Oct 14, 2025 मंचर-शिरूर रस्त्यावर कॅनॉलच्या मोरीजवळ झालेल्या एका भीषण अपघातात अवसरी बुद्रुक येथील दोन भावांना आपले प्राण गमवावे लागल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. दुचाकी मोरीजवळील कठड्याला आदळली व दोघेजण कॅनॉलच्या 20 फूट खोल खड्ड्यातील पाण्यात पडल्याने हा अपघात झाला आणि अवसरी बुद्रुक गावावर शोकाची गडद छाया पसरली आहे.