पक्षी सप्ताहानिमित्त जालना जिल्ह्यातील दावलवाडी शिवार परिसरात बुधवार दि. 5 नोव्हेंबर 2025 रोजी दुपारी 1 वाजता आयोजित पक्षी निरीक्षण कार्यक्रम उत्साहात पार पडला. दरवर्षी प्रमाणे याही वर्षी 5 नोव्हेंबर 2025 रोजी अरण्यऋषी मारुती चितमपल्ली यांच्या वाढदिवसानिमित्त आणि 12 नोव्हेंबर रोजी पक्षी अभ्यासक डॉ. सलीम अली यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ संपूर्ण महाराष्ट्रात पक्षी सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. या निमित्त महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती जालना आणि सारस वन्यजीव संस्थेने कार्यक्रम घेतला