उमरेड: उटी येथे सेवा पंधरवडा कार्यक्रमांतर्गत नागरिकांच्या सोडविण्यात आल्या समस्या
Umred, Nagpur | Sep 23, 2025 उमरेड तहसील कार्यालया अंतर्गत महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान अंतर्गत सेवा पंधरवडा साजरा करण्यात येत आहे. या अंतर्गत उटी येथे शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाला आमदार संजय मेश्राम यांची प्रमुख उपस्थिती होती. या शिबिरामध्ये शेकडो लाभार्थ्यांना एकाच छताखाली विविध शासकीय योजनांबद्दल माहिती देत त्यांना सेवा पुरविण्यात आली