आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर भाविकांच्या सुरक्षित व सुरळीत प्रवासासाठी रेल्वे विभागाच्या तयारीचा आज कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह यांनी आढावा घेतला. नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत कुंभमेळा काळातील रेल्वे वाहतूक व्यवस्थापन, अतिरिक्त गाड्यांचे नियोजन, रेल्वे स्थानकांवरील सुविधा, गर्दी नियंत्रण व सुरक्षा उपाययोजनांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. लाखो भाविक नाशिकमध्ये दाखल होणार असल्याने रेल्वे व्यवस्थेचे काटेकोर नियोजन आवश्यक असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.