फुलंब्री: फुलंब्री येथील नगरपंचायतीच्या निवडणुकीत तीन नगराध्यक्ष पदासाठी तर चार प्रभागात चार नगरसेवक पदासाठी उमेदवारी दाखल
फुलंब्री येथील नगरपंचायत निवडणुकीसाठी नगराध्यक्ष पदासाठी भाजपकडून सुहास शिरसाट व दोन जणांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली आहे. तर नगरसेवक पदासाठी प्रभाग क्रमांक चार, सात, आठ आणि नऊ या प्रभागात उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहे. शनिवार आणि सोमवारी दोन दिवस शिल्लक असल्याने आता दोन दिवसात उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे.