राहुरी: तनपुरे कारखान्याची उद्या सर्वसाधारण सभा,सभापती अरुणसाहेब तनपुरे
राहुरी फॅक्टरी येथील डॉ. बाबुराव बापुजी तनपुरे सहकारी साखर कारखाना सुरु करण्यासाठी वार्षिक सर्वसाधारण सभा उद्या मंगळवारी सकाळी १० वाजता लोकनेते रामदास पाटील धुमाळ महाविद्यालय, जिमखाना हॉलमध्ये पार पडणार आहे. सभासद कामगार शेतकऱ्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन चेअरमन अरुण तनपुरे यांनी केले आहे. आज सोमवारी सायंकाळी तनपुरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.