घर लोन सेटलमेंटच्या नावाखाली 4.15 लाखांची फसवणूक; पती-पत्नीविरुद्ध पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल नाशिक | पंचवटी पोलीस ठाण्यात घर लोन सेटल करून देण्याचे खोटे आश्वासन देत 4 लाख 15 हजार 800 रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी पती-पत्नीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी अनंत श्रीकांत साठे (वय 46, व्यवसाय टीव्ही रिपेअरिंग, रा. हिरावाडी, पंचवटी) यांनी फिर्याद दिली आहे. योगेश कांतीलाल बाविस्कर व त्रिवेणी योगेश बाविस्कर अशी आरोपींची नावे असून, 24 जून 2023 ते 10 मार्च 2025 या कालाव