कर्जत: माथेरानमध्ये निवडणुकीकरिता ई-रिक्षांचा सर्रासपणे वापर
Karjat, Raigad | Nov 29, 2025 माथेरानमध्ये निवडणुक आयोगाने निवडणूक करिता ई-रिक्षाचा वापर सुरू केल्यामुळे माथेरानमधील स्थानिक व येणाऱ्या पर्यटकांना रिक्षा अपुऱ्या पडू लागल्याने येथील रिक्षाचालकांबरोबर पर्यटकांच्या वादावादीचे प्रकार वाढू लागले आहेत. परंतु शासनाने मात्र सहा रिक्षा निवडणूक करिता वापर केल्याने हा प्रकार होत असल्याचे रिक्षा अपुऱ्या पडत असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार माथेरान मध्ये सध्या फक्त वीस इ रिक्षा सुरू आहे व सर्वोच्च न्यायालयाने या रिक्षांमध्ये सहा महिन्याच्या आत मध्ये वाढ व्हावी असा आदेश जारी केला आहे परंतु त्यावरती अंमलबजावणी आतापर्यंत झालेली नाही.