सिंदखेड राजा: तालुक्यात ढगफुटी सदृश्य पाऊस, शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठे नुकसान
सिंदखेड राजा तालुक्यातील पळसखेड चक्का, किनगाव राजा परिसरात 15 सप्टेंबर रोजी दुपारी 2 वाजता च्या दरम्यान ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने नदी नाल्यांना पूर आला आलेल्या पुरामुळे व सतत पावसामुळे शेतातील सोयाबीन ,कपाशी, मका ,तर फळबागा व भाजीपाला पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.