धुळे तालुक्यातील वेल्हाणे गावात विकास श्रावण महाले (२५) या तरुणाची हत्या झाल्याप्रकरणी १४ जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. दोन महिन्यांपूर्वी झालेल्या पालखी वादातून हा खून झाल्याचा संशय आहे. नाशिकहून दिवाळीसाठी आलेल्या विकासवर आरोपींनी हल्ला करून त्याला ठार मारले. राजेंद्र नथू सिंग पाटील यांच्या फिर्यादीवरून गुन्हा नोंदवला असून, प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक धनंजय पाटील करत आहेत.