घाटंजी: सावळी शेत शिवारात करंट लागून एकाचा मृत्यू,पारवा पोलिसात गुन्हा दाखल
फिर्यादी जयवंत शिंदे यांच्या तक्रारीनुसार पाच नोव्हेंबरला एक वाजताच्या सुमारास फिर्यादीचे भाऊजी रामलू पवार हे आरोपी नागय्या अण्णा यांच्या शेताच्या बाजूला तारकुंपणाचे काम करत असताना आरोपीने त्याच्या पिकवलेल्या शेतात अवैधरीत्या टाकलेल्या ताराचा करंट रामलू पवार यांना लागल्याने त्यांचा मृत्यू झाला.त्यांच्या मरणास आरोपी कारणीभूत असल्याची तक्रार पाच नोव्हेंबरला सायंकाळी अंदाजे चार वाजताच्या सुमारास पारवा पोलिसात देण्यात आली यावरून आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.