कल्याण: कल्याण येथे रिक्षाचालकाकडून महिलेची छेडछाड
Kalyan, Thane | Nov 27, 2025 आज दिनांक 27 नोव्हेंबर रोजी रात्री 12च्या सुमारास कल्याण पश्चिम मार्केट परिसरात धक्कादायक घटना घडली आहे. कल्याण शिवाजी चौक नारायण वाडी मुख्य बाजारात पंचवीस वर्षीय महिलेची नशेत धुंद रिक्षाचालकाकडून भर रस्त्यात छेडछाड करण्यात आली आहे. त्यानंतर संतप्त नागरिकांनी रिक्षाचालक चोप देत पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. रमेश घुडे असे या रिक्षाचालकाचे नाव असून कल्याण महात्मा फुले पोलिसांनी त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करून घेतला आहे.