मुर्तीजापूर: तालुक्यातील ग्राम कुरुम येथे अवैध गावढी दारू विक्रेत्यावर माना पोलिसांची धाडसी कारवाई मुद्देमालासह आरोपीला केली अटक
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या संकल्पनेतून सुरू असलेल्या"ऑपरेशन प्रहार"मोहिमे अंतर्गत माना पोलीस स्टेशनचे ठाणेदार गणेश नावकार यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वानखडे यांनी आपल्या सहकाऱ्यांसमवेत शनिवार ४ ऑक्टोंबर रोजी दुपारी एकच्या दरम्यान ग्राम कुरुम येथे विक्रेत्यावर धाड टाकली असता आरोपी बबलू पवार वय ३५ वर्ष याला रंगेहाथ पकडले त्याच्याकडून अवैधरित्या विक्रीस ठेवलेली १५ लिटर गावठी दारू,ॲल्युमिनियमचा डब्बा जप्त केला असून अधिक तपास माना पोलीस करीत आहेत.