धरणगाव तालुक्यातील पिंपरी खुर्द गावातील बसस्थानकाजवळ गावातील रस्ता वहिवाटच्या कारणावरून दोन भावांना गावातील चार जणांनी शिवीगाळ करत मारहाण करून जीवेठार मारण्याची धमकी दिल्याची घटना 29 ऑक्टोबर रोजी दुपारी 3 वाजता घडली. या संदर्भात शुक्रवारी 31 ऑक्टोबर रोजी दुपारी 4 वाजता धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.