शिरपूर: तालुक्यातील विवाहितेने माहेरी चांदसुर्या येथे केले विष प्राशन,शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद
Shirpur, Dhule | Nov 1, 2025 तालुक्यातील टेंभेपाडा येथील 36 वर्षीय विवाहितेने माहेरी चांदसूर्या येथे विषारी औषध प्राशन केल्याने उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.याप्रकरणी शिरपूर शहर पोलीस ठाण्यात 1 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी साडे वाजेच्या सुमारास अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.मीनाबाई रमेश पावरा वय 36, रा. टेंभेपाडा, ता. शिरपूर मयत विवाहितेचे नाव आहे. याबाबत मयत महिलेचा भाऊ मोहन ढेबरा पावरा यांनी शहर पोलीस ठाण्यात खबर दिली आहे.पुढील तपास पोहेकॉ सुनील जावरे करीत आहे.