धरणगाव: बसस्थानक परिसरातून मोबाईल लांबविणाऱ्या सराईत गुन्हेगाराला मास्टर कॉलनीतून अटक; तीन मोबाईल हस्तगत
जळगाव शहरातील नवीन बस स्थानकावर प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन मोबाईल चोरी करणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला मास्टर कॉलनीतून गुरूवारी २५ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता जेरबंद करण्यात जिल्हापेठ पोलिसांना यश आले आहे. हमीद आयुब खान (वय २२, रा. मास्टर कॉलनी, जळगाव) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून, त्याच्याकडून चोरीचे तीन महागडे मोबाईल फोन हस्तगत करण्यात आले आहेत.