कळमनूरी: कामठा फाटा शिवारात दुचाकीचा अपघात ,एक जण जागेवर ठार
कळमनुरी तालुक्यातील कामठा फाटा ते हदगाव या रस्त्यावर कामठा फाटा शिवारात दि 7 नोव्हेंबर रोजी रात्री 8 वा. सुमारास हदगाव तालुक्यातील मरडगा येथील अरविंद गुलाबराव शेळके वय 31 वर्षे हे आ. बाळापुर कडून आपल्या गावी जात असताना कामठा फाटा शिवारात आल्यानंतर त्यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने त्यांचा अपघात होऊन जागेवरच ठार झाले आहेत .आ.बाळापूर येथील ग्रामीण रुग्णालयात त्यावर शव विच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आल्याची माहिती आज दि 8 नोव्हेंबर रोजी प्राप्त झाली आहे .