शेअर व आयपीओमध्ये मोठ्या नफ्याचे आमिष दाखवून एका गृहिणीकडून तब्बल 55 लाख रुपयांची आर्थिक फसवणूक करण्यात आली. ही घटना 28 जुलै ते 4 सप्टेंबर 2025 या कालावधीत पुनावळे येथे घडली. याप्रकरणी चार जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुंजन गौरव अट्रावलकर यांनी रावेत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.