पनवेल: महिलांच्या डब्यात शिरला,मग दाराजवळ आलेल्या तरुणीला धावत्या लोकलमधून खाली फेकले, पनवेल मधील थरारक व्हिडिओ आला समोर
पनवेलच्या खांदेश्वर स्थानक येथून एक माथेफिरू महिलांच्या डब्यात शिरला. महिला बाहेर जाण्यासाठी सांगू लागल्या मात्र तो ऐकत नव्हता,तेव्हा एक तरुणी पुढे आली आणि ते दरवाजा जवळ येऊन त्याला खाली उतरण्यास सांगू लागली. तेवढ्यात माथेफिरूने धावत्या लोकलमधून तरुणीला खाली फेकले आणि लोकलमध्ये एकच खळबळ उडाली.सर्व महिलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.मात्र दुसऱ्या डब्यातील पुरुषांनी हा प्रकार पाहिला आणि लोकल थांबताच माथेफिरूला पकडून चोप दिला आणि पोलिसांच्या ताब्यात दिले मात्र तरुणी जखमी झाली आहे.