चिखली: नगरपालिकेच्या प्राणांगणात अग्निशमन दलाच्या ताब्यात नवीन वाहनाचे लोकार्पण आमदार महाले यांच्या हस्ते संपन्न
चिखलीतील नागरिकांच्या सुरक्षेसाठी आ. श्वेता ताई महाले पाटील यांच्या पाठपुराव्याने नगर परिषद अग्निशमन दलाच्या ताफ्यात नवे, सुसज्ज वाहन दाखल झाले असून आज या वाहनाचे लोकार्पण पालिकेच्या प्रांगणात केले. या वेळी मुख्याधिकारी श्री. प्रशांतजी बिडगर, ठाणेदार श्री. संग्राम पाटील, श्री. सुरेशअप्पा खबूतरे ज्येष्ठ नेते,श्री डॉ प्रतापसिंग राजपूत ज्येष्ठ नेते,श्रीमती सौ. विमलताई देव्हडे माजी नगराध्यक्ष,आदी मान्यवर उपस्थित होते.