लोहारा: माकणी येथील निम्म तेरणा धरणाचे 10 दरवाजे उघडले,नदीकाठच्या गावांना प्रशासनाने दिला सतर्कतेचा इशारा
लोहारा तालुक्यातील माकणी येथील निम्न तेरणा प्रकल्पात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक होत असल्याने , तेरणा धरणाचे 10 दरवाजे दि.16 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजता उघडण्यात आले आहेत, मोठ्या प्रमाणात तेरणा नदी पात्रात पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देखील देण्यात आला आहे. दरम्यान धरण क्षेत्रात पाण्याची आवक लक्षात घेता, पुढील काही वेळात धरण 100 टक्के भरलं जाणार आहे..