यवतमाळ: उमरखेड येथे उपोषण मंडप हटविताना पोलीस व आंदोलकांमध्ये तणाव, एक पोलीस जखमी; आठ जणांना अटक
उपविभागीय अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार उमरखेड शहरातील सारडा पेट्रोल पंप समोरील छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळा कुर्ती समितीच्या उपोषण मंडप हटविण्याची कार्यवाही करण्याकरिता आलेल्या पोलिसांसोबत आंदोलनकर्त्यांची बाचाबाची होऊन मंडप हटविण्यास मजाव करताना आंदोलनकर्त्यांच्या धक्काबुक्कीत एक पोलीस जखमी झाल्याची घटना घडली असून या प्रकरणी आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करून पोलिसांनी अटक केली आहे.