अज्ञात चोरट्याने खंडोबानगर येथील शेतवस्तीवरून घरातून सोन्याची पोत व रोख रक्कम असा 11 हजार 500 रुपये किमतीचा ऐवज लंपास केल्याची घटना शनिवारी दुपारी 1 वाजेच्या सुमारास उघडकीस आली.प्रकरणात शरद दत्तात्रय साबळे वय 36 वर्षे राहणार खंडोबानगर यांनी फिर्याद दिली आहे त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांच्या पत्नी सकाळी 9 वाजता माहेरी गेल्या होत्या तर फिर्यादी हे देखील भाजी मंडईत कामा निमित्त गेले दुपारी दोघेही 1 वाजेच्या सुमारास परत आले असता चोरी झाल्याचे लक्षात आले.