वाई: गुरेबाजार झोपडपट्टी येथे हद्दपारीच्या आदेशाचा भंग केल्याचा वाई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
Wai, Satara | Oct 19, 2025 T गुरेबाजार झोपडपट्टी येथे हद्दपारीच्या आदेशाचा भंग केल्याचा वाई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल सिद्धनाथवाडी येथील गुरेबाजार झोपडपट्टी येथे दि. १८ ऑक्टोबर रोजी रात्री पावणे आठ वाजता सारंग ज्ञानेश्वर माने वय २३ रा. गुरेबाजार झोपडपट्टी याने पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी दिलेल्या आदेशाचे उल्लंघन केल्याचे आढळून आल्याने त्याच्यावर पो. कॉ. हेमंत शिंदे यांनी वाई पोलीस ठाण्यात दि. १८ ऑक्टोबर रोजी रात्री ८ वाजता गुन्हा दाखल केलेला असून याचा तपास वाई पोलीस ठाण्याचे हवालदार सपकाळ हे करत आहेत.