खेड: दिघी येथे पाचवर्षीय बालकाचा ट्रेलरच्या धडकेत मृत्यू
Khed, Pune | Oct 22, 2025 धडक दिलेल्या भरधाव ट्रेलरच्या चाकाखाली सापडून दुचाकीवरील पाचवर्षीय बालकाचा मृत्यू झाला, तर महिला गंभीर जखमी झाली. दिघीतील अलंकापुरम मार्गावर ही दुर्घटना घडली. शिवांश नितीन रासकर (वय ५) असे मृताचे नाव आहे.जयश्री संदीप पाटील (वय ३५) या जखमी झाल्या. याप्रकरणी अनिल रासकर (रा. चऱ्होली बुद्रुक) यांनी दिघी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.