गोंदिया: मरारटोली कब्रस्तानसमोर ऑटो सार्वजनिक रोडवर उभा करून वाहतुकीस अडथळा निर्माण केल्या प्रकरणी चालकावर गुन्हा नोंद
रामनगर पोलीस ठाणे अंतर्गत येणाऱ्या मरारटोली कब्रस्तानसमोर गोंदिया येथे चार नोव्हेंबर च्या सायंकाळी 5:45 वाजेच्या दरम्यान ऑटो क्रमांक एम एच 35 एच 1718 हा ऑटो सार्वजनिक रोडवर उभा करून वाहतुकीस अडथळा निर्माण केला आरोपी मुकेश मेश्राम वय 35 राहणार बनाथर याच्यावर पोलीस हवालदार राजू वनवे यांच्या तक्रारीवरून रामनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे