समुद्रपूर: १७ सप्टेंबरपासून राबविण्यात येणाऱ्या 'मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानासंबधी प.स.मध्ये कार्यशाळा:७१ ग्रा.प.चा समावेश
समुद्रपूर: ग्रामपंचायतींच्या कार्यक्षमतेत वाढ होऊन त्या सक्षम बनाव्यात याकरिता शासनाने मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान राबविण्याचा निर्णय घेतला आहे. याअंतर्गत उत्कृष्ट काम करणाऱ्या ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषदांना तालुका, जिल्हा, महसूल विभाग आणि राज्य अशा चार स्तरांवर प्रोत्साहन दिले जाणार आहे.या अभियान तालुक्यातील ७१ ग्रामपंचायतीमध्ये राबविण्यात येणार असल्याची माहिती गटविकास अधिकारी सतिश टिचकूले यांनी दिली आहे.यासंबंधी पंचायत समितीच्या सभागृहात कार्यशाळा पार पडली.