शिरपूर: शहरालगत एका गावातून अल्पवयीन मुलगी बेपत्ता,शहर पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल
Shirpur, Dhule | Oct 14, 2025 तालुक्यातील एका गावातून 17 वर्षे 5 महिने वयाची अल्पवयीन अल्पवयीन मुलगी 4 ऑक्टोबर रोजी घरात झोपलेले असतांना 5 ऑक्टोबर रोजी पहाटे 4 वाजेच्या सुमारास बेपत्ता झाल्याने अज्ञात व्यक्तीने अपहरण केल्याच्या संशयावरून शहर पोलीस ठाण्यात 14 ऑक्टोबर रोजी अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याप्रकरणी बेपत्ता मुलीच्या 33 वर्षीय वडिलांनी तक्रार दाखल केली आहे.पुढील तपास शहर पोलीस ठाण्याचे पीएसआय संदीप दरवडे करीत आहे