बार्शी: 24 तासांत 38 मिमी पाऊस; तालुक्यात भीतीचे वातावरण -तहसील कार्यालयात एफ.आर.शेख यांचे आवाहन
Barshi, Solapur | Sep 27, 2025 बाशी तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. तालुक्यात आतापर्यंत 1017 मिमी पावसाची नोंद झाली असून तो सरासरीपेक्षा दुपटीने अधिक आहे. अनेक ठिकाणी पुलांवरून पाणी वाहत असल्याने नागरिकांना अनावश्यक प्रवास टाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तहसीलदार एफ. आर. शेख यांनी २७ रोजी दुपारी साडेपाच वाजण्याच्या सुमारास केले. शनिवार- रविवारीही मुसळधार पावसाची शक्यता असल्याने सतर्क राहण्याचा सल्लाही त्यांनी दिला आहे.