ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास हा केंद्र सरकारच्या विविध योजनांवर अवलंबून असून, या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी सर्व शासकीय यंत्रणांनी एकमेकांशी समन्वय राखून प्रयत्नपूर्वक काम करावे, असे निर्देश खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात दिनांक 13 जानेवारी रोजी दुपारी 1 वाजता दरम्यान आयोजित 'जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समिती' (दिशा) च्या आढावा बैठकीत ते बोलत होते. याप्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्ष कविता उईके, आमदार राजू कारेमोरे, जिल्हाधिक