मानगाव: रायगडात मंत्री भरत गोगावले यांचा सुनील तटकरे यांना धक्का..@raigadnews24
Mangaon, Raigad | Oct 21, 2025 रायगड जिल्ह्यात मंत्री भरत गोगावले यांनी सुनील तटकरे यांना मोठा धक्का दिलाय. जिल्हा परिषद निवडणुकांच्या तोंडावर गोरेगाव विभागात राष्ट्रवादी काँग्रेसला खिंडार पडले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचे कट्टर समर्थक विकास गायकवाड यांनी आपल्या समर्थकांसह शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केलाय.