भंडारा: उभ्या टिप्परला धडक, दुचाकी चालक तरुण ठार! भुयार येथील घटना
नागपूर-नागभीड मार्गावरील भुयार येथे शुक्रवार, १७ ऑक्टोबरला रात्री १२ वाजण्याच्या सुमारास टिप्पर आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला. या अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. महेश नारायण पांडव (२५, नवेगाव पांडव, ता.नागभीड, जि.चंद्रपूर), असे मृताचे नाव आहे. महेश भिवापूरहून स्वगावी एमएच ३५ सीए ९७८२ क्रमांकाच्या दुचाकीने जात असताना भुयार गावाजवळ बंद अवस्थेत रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या टिप्परला त्याने धडक दिली. धडकेत तो गंभीर जखमी झाला आणि घटनास्थळीच मृत्यू झाला.