भोर: नसरापूर ग्रामपंचायत कार्यालयात तोडफोड; मी प्रहार संघटनेचा माणूस असं सांगत महिलांना धमक्या.
नसरापूर ग्रामपंचायतीत ग्रामसेवक विजय कुलकर्णी यांचा शोध घेत आलेल्या एका व्यक्तीने गोंधळ घालून महिला कर्मचाऱ्यांना प्रश्नांचा भडिमार केला,, टेबलाची काच फोडून कार्यालयात तोडफोड केली आणि "मी प्रहार संघटनेचा माणूस आहे, काहीही करू शकतो" अशी धमकी दिल्याचा प्रकार घडला आहे.