जिल्ह्यातील महसूल कार्यालय, महसूल विभागातील ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) आणि मंडळाधिकारी यांनी सोमवार पासून बेमुदत संप सुरू केल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. उत्पन्नाचा दाखला, जात प्रमाणपत्र, रहिवासी दाखला, सातबारा उतारे यासारखी अत्यावश्यक कागदपत्रे मिळण्यास विलंब होत असून नागरिकांना कार्यालयांचे फेरे मारावे लागत आहेत. या संपाचा फटका ग्रामीण भागातील शेतकरी, विद्यार्थी, तसेच गरजू नागरिकांना बसत असून प्रशासनाचे कामकाज पूर्णतः ठप्प झाल्याचे चित्र आहे.