पनवेल: नवी मुंबईतून मनसे कार्यकर्ते पाडवा मेळाव्यासाठी रवाना, शहराध्यक्ष गजानन काळेंनी दिली माहिती
Panvel, Raigad | Apr 9, 2024 मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या गुढी पाडवा मेळाव्यासाठी नवी मुंबईतील मनसे कार्यकर्ते शिवतीर्थ या सभास्थळी जाण्यासाठी नवी मुंबईतून रवाना झाले आहेत. नवी मुंबईतून मोठ्या संख्येने मनसे कार्यकर्ते सभेसाठी रवाना झाले असून कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळतो आहे. नवी मुंबई शहराध्यक्ष गजानन काळे यांच्यासह हजारो कार्यकर्ते निघाले असून यावेळी राज ठाकरे सांगतील ते धोरण आणि राज ठाकरे बांधतील ते तोरण अशी प्रतिक्रिया शहराध्यक्ष गजानन काळे यांनी ९ एप्रिल रोजी ४ वा. वाशी येथे दिली.