दौंड: दौंड नगरपालिकेत 'मतदार यादी'वरून राजकीय नाट्य, सत्तारुढ पक्षाचंच जोरदार आंदोलन
Daund, Pune | Oct 25, 2025 दौंड नगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी तयार करण्यात आलेल्या मतदार यादीतील गोंधळामुळे आज (शनिवार, 25 ऑक्टोबर) मोठा गोंधळ झाला.राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रवक्त्या वैशाली नागवडे आणि वीरधवल जगदाळे यांनी मतदार यादीत कोणतीही पूर्वसूचना न देता नावे दुसऱ्या प्रभागात टाकल्याबद्दल नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना जाब विचारत त्यांच्या दालनात ठिय्या आंदोलन केले.