दक्षिण सोलापूर: जुळे सोलापुरातील पाण्याचा निचरा लवकर करा, अन्यथा कर भरणार नाही: सामाजिक कार्यकर्ते रमेश हसापुरे यांचा इशारा...
स्वामी विवेकानंद नगर भाग १ मध्ये पाण्याचा योग्य प्रकारे निचरा न झाल्यामुळे परिसरात पाणी तणाव निर्माण झाला आहे. त्यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. सामाजिक कार्यकर्ते रमेश हसापुरे यांनी सोमवारी सायंकाळी ५ वाजता पत्रकारांशी बोलताना महापालिका आयुक्तांकडे निवेदन सादर करत वेळीच पाण्याचा निचरा करण्यासाठी उपाययोजना करण्याचा आग्रह केला. त्यांनी स्पष्ट इशारा दिला की, योग्य कारवाई न झाल्यास येथील नागरिक पाणी कर न भरण्याचा इशारा दिला आहे.