अमळनेर तालुक्यातील कळमसरे शिवारात एका ४ वर्षीय बालिकेचा बाललैंगिक छळ झाल्याची धक्कादायक घटना ३१ डिसेंबर रोजी दुपारी २ वाजता घडली आहे. याप्रकरणी दुपारी ४ वाजता पीडित बालिकेच्या मातेने दिलेल्या फिर्यादीवरून मारवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपी मनोहर राजेंद्र पाटील याला पोलिसांनी तातडीने अटक केली आहे.