परभणी: पारदेश्वर मंदिर परिसरातून महिलेची पर्स पळणाऱ्या दोन अल्पवयीन बालकांना घेतली ताब्यात इतरही गुन्हे उघडतील
महिलेची पर्स पळवणाऱ्या दोन अल्पवयीन मुलांना नानलपेठ पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून इतरही गुन्हे उघडकीस आले आहेत. तीन मोबाईल,रोखर रक्कम आणि दोन दुचाकी असा एकूण एक लाख 33 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करून दोन्ही अल्पवयीन मुलांची निरीक्षण गृहात रवानगी करण्यात आली आहे.अशी माहीती नानलपेठ पोलीसांनी दिनांक एक नोव्हेंबर रोजी दुपारी दोन वाजता दिली.