चिखली: मेहेकर जालना मार्गावरील राहेरी बु येथील पुलावरून प्रवास करू नये–लोक जागर परिवाराचे विश्वस्त प्रवीण गीते
जुना मेहकर जालना महामार्गावर राहेरी बुद्रुक पुलावरून दिनांक 28 सप्टेंबर रोजी दुपारपासून खूप मोठ्या प्रमाणात पाण्याचा प्रवाह वाढत आहे. आणि सध्या सुद्धा सुरू आहे त्यामुळे प्रवाशांनी वाहनधारकांनी या मार्गावरून जाऊ नये अशा प्रकारची सूचना सामाजिक कार्यकर्ते, तथा लोकजागर परिवाराचे विश्वस्त प्रवीण गीते यांनी स्वतः व्हिडिओ शूट करून माहिती दिली आहे.