श्रीवर्धन: श्रीवर्धन येथे खासदार सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत विविध पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये जाहीर प्रवेश
आज शनिवार दिनांक २२ नोव्हेंबर २०२५ रोजी दुपारी १ च्या सुमारास श्रीवर्धन येथे खासदार सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत विविध पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला. यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे शोएब हमदुले, जुनेद दुस्ते, इरफान सोनाले, सलमान सोनाले यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीच्या विचारधारेने प्रेरित होऊन पक्षप्रवेश केला. पक्षाचा प्रदेशाध्यक्ष या नात्याने सर्वांचे राष्ट्रवादी परिवारात स्वागत केले आणि पुढील राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी नव्याने पक्षात सामील झालेल्या पदाधिकाऱ्यांना संबोधित करताना, राष्ट्रवादी काँग्रेसची विचारधारा, ध्येयधोरणे आणि विकासाचा दृष्टीकोन सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवून पक्षसंघटन अधिक मजबूत करण्याबाबत मार्गदर्शन केले.