पनवेल: श्री देवकादेवी मंदिर परिसराला सिडकोची नोटीस
Panvel, Raigad | Nov 29, 2025 सिडकोने नवी मुंबई परिसरातील अनेक जागेवरील अनधिकृत बांधकामे यांना कायदेशीर नोटीस पाठवून ते बांधकामे, जमिनीवरील अतिक्रमणे हटवावीत असे आदेश दिले आहेत. अशाच प्रकारचा आदेश सिडको प्रशासनाने 1936 साला पासून अस्तित्वात असलेल्या प्लॉट नंबर 10 ए, सेक्टर 11, घणसोली, नवी मुंबई येथील श्री देवकादेवी मंदिर व मंदिर परिसराच्या भोवताली असलेल्या 64 गुंठे परिसराला अनधिकृत ठरवत या जमिनीवरील अतिक्रमणे हटवावीत. व जागेवरील ताबा सोडावा अशी नोटीस सदर मंदिराच्या विश्वस्त मंडळाला दिले आहेत.