मारेगाव: चोरीच्या उद्देशाने अंधारात लपून बसून असलेल्या इसमाला मारेगाव पोलिसांनी केली अटक करणवाडी येथील घटना
मारेगाव पोलिसांना माहिती मिळाली की करणवाडी फाट्याजवळ एक इसम संशयित रित्या फिरत आहे. माहितीवरून पोलिसांनी करणवाडी शिवारात मोहन अवताडे यांचे शेताजवळ एक इसम तोंडावर दुपट्टा बांधून फिरत असताना पोलिसाने ताब्यात घेतले. पोलिसांनी त्याला नाव गाव विचारले असता त्यांनी आपले नाव योगेश नारायण जगताप, रा. धामणगाव रेल्वे ह. मु. त्रिमूर्ती नगर नागपूर असे सांगितले.