मोहाडी: मोरगाव येथील तरुणाचा भंडारा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू, घटनेचा मर्ग मोहाडी पोलिसात दाखल
मोहाडी पोलीस ठाणे हद्दीत असलेल्या मोरगाव येथील तरुणाचा दि. 24 नोव्हेंबरला दुपारी 4 वा. जिल्हा सामान्य रुग्णालय भंडारा येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला. अमोल गुलाब भुते वय 24 वर्षे असे मृतक तरुणाचे नाव असून त्याने अतिप्रमाणात दारू सेवन केल्याने त्याला भंडारा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती केले होते. मात्र उपचारदरम्यान अमोलचा मृत्यू झाला. याप्रकरणी पोलीस पंचनामा व प्राप्त वैद्यकीय अहवालावरून घटनेचा मर्ग दि. 26 नोव्हेंबर रोज बुधवारला दुपारी 3 वा.मोहाडी पोलिसात दाखल करण्यात आला आहे.