बुलढाणा: माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याचा अवमान करणाऱ्या समाजकंटकांना अटक करा- उबाठा शिवसेना प्रवक्त्या जयश्री शेळके
महायुती सरकारचे द्वेषाचं राजकारण आणि कोलमडलेल्या कायदा-सुव्यवस्थेमुळे राज्यात माणसंच नाही तर पुतळे देखील असुरक्षित झाले आहेत. दादर येथील माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याचा अवमान करणाऱ्या समाजकंटकांना अटक करावी आणि कठोर शिक्षा व्हावी यासाठी आज १७ सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजता बुलढाणा जिल्हा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)पक्षाच्या वतीने आंदोलन करण्यात आले.