कुही: शाळेला शिक्षक मिळण्याच्या मागणीसाठी खैरलांजी येथे नागरिकांचे ठिय्या आंदोलन
Kuhi, Nagpur | Oct 13, 2025 ग्रामीण भागात असलेल्या मौजा खैरलांजी येथे जिल्हा परिषद शाळेला शिक्षक मिळण्याच्या मागणीसाठी नागरिकांच्या वतीने 13 ऑक्टोबर सोमवारला दुपारी 1 वाजताच्या सुमारास ठिय्या आंदोलन सुरू करण्यात आले. याबाबत चे वृत्त असे की खरलांजी येथील जिल्हा परिषद शाळेत 1 ते 7 वर्ग असून मात्र विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी एकच शिक्षक असल्याने तीव्र नाराजी व्यक्त केली. शाळेला शिक्षक मिळण्याच्या मागणीसाठी नागरीकांनी ठिय्या आंदोलन सुरू करण्यात आले.